गोवा विधानसभा निवडणूक; एसटी आरक्षण कायद्याला न्यायालयात आव्हान

यु्क्तीवादानंतर अंतरिम दिलासा देण्यासंदर्भात उद्या होणार निर्णय : प्रवीण फळदेसाई; गोवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी (एसटी) आरक्षण लागू करण्यासंदर्भातील कायद्याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
गोवा विधानसभा निवडणूक; एसटी आरक्षण कायद्याला न्यायालयात आव्हान

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी (एसटी) आरक्षण लागू करण्यासंदर्भातील कायद्याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर आज बुधवारी न्यायालयात युक्तीवाद झाला. यावर अंतरिम दिलासा देण्यासंदर्भात उद्या दुपारी २.३० वाजता निर्णय होणार आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना उपसॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई यांनी सांगितले की, गोवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी (एसटी) आरक्षण लागू करण्यासंदर्भातील कायद्याला आव्हान दिले आहे. आणि काही अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली आहे. त्यावर न्यायालय उद्या निकाल सुनावणार आहे. त्यावर आज मंगळवारी न्यायालयात युक्तीवाद झाला. 

याचिकादाराने म्हटले आहे की, काही अधिसूचना निवडणूक आयुक्ताकडून जाहीर होणे बाकी आहे. ते होऊ नये असा याचिकादाराचा आग्रह आहे. मतदारसंघांचे आरक्षण होऊ नये किंवा यासंदर्भात कुठलाही विषय त्यांनी घेतलेला नाही. मात्र, संबंधित कायदा हा घटनाविरोधी असल्याचे व त्यातून संविधानाने दिलेल्या आदेशाचा भंग होत असल्याचे याचिकादाराने नमूद केले आहे.आपण न्यायालयात या कायद्याचा बचाव करणार असल्याचे प्रवीण फळदेसाई यांनी सांगितले.

फर्नांडिस यांची न्यायालयात याचिका 

 गोवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी (एसटी) आरक्षण लागू करण्यासंदर्भातील कायद्यालाॲडवीन फर्नांडिस यांनी न्यायालयात  आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर शेड्युल ट्राईब ऑफ गोवा’ या संघटनेने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. त्यात केंद्र सरकार, कायदा व न्याय मंत्रालय तसेच इतर संबंधितांना प्रतिवादी केले आहे. 

 

हेही वाचा
सर्व पहा