नावेली-साखळी येथे अपघाग्रस्ताच्या मदतीला धावले मुख्यमंत्री

वाहनांचा ताफा थांबवून केली मदत; नावेली साखळी येथे अपघातात जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या एका युवकाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) धावले. अपघात घडला तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा त्या रस्त्याने जात होता.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
55 mins ago
नावेली-साखळी येथे अपघाग्रस्ताच्या मदतीला धावले मुख्यमंत्री

पणजी : नावेली साखळी येथे अपघातात जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या एका युवकाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) धावले. अपघात घडला तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा त्या रस्त्याने जात होता. मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहनांचा ताफा थांबवून रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या युवकावर प्रथमोपचार केले. त्याचबरोबर हॉस्पिटलात दाखल करण्यासाठी आवश्यक सहकार्य केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीही अपघातात रस्त्यांवर जखमी होऊन पडलेल्या अनेकांना आपल्या वाहनांचा ताफा थांबवून मदत केली आहे. त्याचबरोबर आपल्या ताफ्यातील वाहन देऊन हॉस्पिटलात दाखल करण्यासाठी सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री राज्यभरात फिरत असताना कुठेही रस्त्यावर अपघात झालेला दिसल्यास मुद्दामहून गाडी थांबवून जखमी झालेल्यांवर प्रथमोपचार करून आवश्यक मदत करीत असतात. त्यांच्या उपस्थितीमुळे चक्रे लवकर फिरून अपघातग्रस्तांना जलद मदत मिळण्यासाठी सहकार्य  होत असते. त्यांच्या या कार्याचे लोकांकडून कौतुक होत असते. 

हेही वाचा
सर्व पहा