तोतया आयुक्त प्रकरणी दोषींची मालमत्ता जप्त करणार : मुख्यमंत्री

मंत्रीमंडळ बैठकीनंतर दिली माहिती; अबकारी खात्यातील तोतया आयुक्त प्रकरणी चौकशी सुरू आहे. यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ती व्यक्ती कोणासोबत फिरत होती, कुठे जात होती याची माहिती घेतली जाईल. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. दोषींची मालमत्ता देखील जप्त केली जाईल. तसेच दोषी व्यक्ती सोबत फिरणाऱ्या पोलीस अधीक्षकावर देखील कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
तोतया आयुक्त प्रकरणी दोषींची मालमत्ता जप्त करणार :  मुख्यमंत्री

पणजी : अबकारी खात्यातील तोतया आयुक्त प्रकरणी चौकशी सुरू आहे. यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ती व्यक्ती कोणासोबत फिरत होती, कुठे जात होती याची माहिती घेतली जाईल. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. दोषींची मालमत्ता देखील जप्त केली जाईल. तसेच दोषी व्यक्ती सोबत फिरणाऱ्या पोलीस अधीक्षकावर देखील कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

 शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, मुळात लोकांना देखील समजणे आवश्यक आहे. कोणीही येतो, कसलीही ऑर्डर देतो आणि अशा ऑर्डर खऱ्या समजल्या जातात. सुशिक्षित लोक देखील अशा प्रकारांना बळी पडत आहेत हे पाहून वाईट वाटते. पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण झालेले, याआधी सरकारी नोकरीत काम केलेले लोक देखील अशा प्रकारांना बळी पडत आहेत. याबाबत लोकांनी सजग होणे आवश्यक आहे. गोव्यातील लोकांनी अशा प्रकारांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. याआधी अनेकदा मोठ्या प्रमाणात अशाप्रकारांबाबत माहिती देऊ नही लोक त्याला बळी पडत आहेत.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पर्यटन मास्टर आराखडा आणि पर्यटन धोरण तयार करणाऱ्या एजन्सीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्तगाळी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या २.६५ कोटी रुपयांच्या खर्चाला पोस्ट फॅक्टो मंजूरी देण्यात आली आहे. साखळी येथील क्षेत्रीय कृषी कार्यालयात ७ नव्या पदांना मंजुरी देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटी लिमिटेडला राज्य नागरी स्पेशल एस पी व्ही मध्ये रुपांतरित करण्यास मंजुरी दिली आहे.

कोमुनिदाद कायद्यात बदलाबाबत मंजुरी देण्यात आली असून याबाबत अध्यादेश काढला आहे. यामुळे भविष्यात मध्ये नवीन १०० नियमित पदे तयार होणार आहेत.

सरकार तुमच्या दारी

शनिवार १७ ऑक्टोबर रोजी ११ तालुक्यात सरकार तुमच्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात. अशा समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मिराबाग येथील प्रस्तावित प्रकल्पाचे स्थलांतर

मिराबाग येथे प्रस्तावित असणाऱ्या ५० एमएलडी वॉटर पंपिंग स्टेशन प्रकल्पाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. आता हा प्रकल्प पंचवाडी येथे उभारण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

हेही वाचा
सर्व पहा