पणजी : विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) (Special Intensive Revision SIR) प्रक्रिया रद्द करावी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, ईव्हीएमवर बंदी घालावी आणि मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करावे, या मागण्यांसाठी ‘आमी गोंयचे राखणदार’ संघटनेने आज शनिवारी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.
एसआयआर प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवत संघटनेने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या हक्कांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. एसआयआर प्रक्रिया रद्द करण्यासोबतच ईव्हीएमचा वापर बंद करण्याची आणि मतदारांची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. आंदोलनस्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली.


