प्रतिनिधी | गोवन वार्ता
काणकोण : काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राने आयोजित केलेल्या क्षयरोगावरील पथनाट्य स्पर्धेत किंदळे, पणसुले येथील श्री कात्यायणी बाणेश्वर हायस्कूलला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. दुसरा क्रमांक काणकोण जवाहर नवोदय विद्यालयाला मिळाला.
क्षयरोगावर काणकोण तालुक्यात जनजागृती करण्यासाठी या पथनाट्य स्पर्धेचे आयोजन काणकोण जुन्या बसस्थानकावर करण्यात आले होते.
श्री कात्यायणी बाणेश्वर हायस्कूलच्या पथनाट्यासाठी रेश्मा कामत व गौरीश वेर्णेकर यांनी दिग्दर्शन केले.
पथनाट्यात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक आरोग्य केंद्राचे डाॅ. दिवाकर वेळीप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात
आली.