‘जिनो - प्रुडंट टी-२०’च्या आज उपांत्य लढती


15th December 2017, 03:39 am
पणजी : घुमटेश्वर मडगाव संघाची शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता नित्यानंद स्पोर्टस् क्लबशी जिनो - प्रुडंट टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत लढत होणार आहे. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी दुसऱ्या सत्रात धेंपो ज्युनियर्स विरुद्ध कृष्णा कन्स्ट्रक्शनस् संडे चॅम्प असा होणार आहे. हे सामने पर्वरी येथील गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अकादमी मैदानावर खेळविले जाणार आहेत.
घुमटेश्वर संघाचे नेतृत्व रणजी संघाचा यष्टीरक्षक समर दुभाषी करत आहे तर नित्यानंद स्पोर्टस् क्लबच्या संघात गोवा रणजी संघाचा सलामीचा फलंदाज सुमिरन आमोणकरचा समावेश आहे.
उपांत्य फेरीतील दुसरा सामना दुपारच्या सत्रात २ वाजता सुरू होईल. सौरभ बांदेकरच्या नेतृत्वाखालील धेंपो ज्युनियर्सची लढत साहिल धुरीच्या संडे चॅम्पशी होणार आहे. कीनन वाझ, दर्शन मिशाळ, अमोघ देसाई, हर्षद गडेकर आणि राहुल केणी यांचा या लढतीमध्ये समावेश
आहे.