पतंजलीच्या १४ उत्पादनांवर 'या' राज्यात बंदी; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा बसला फटका

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
30th April, 11:39 am
पतंजलीच्या १४ उत्पादनांवर 'या' राज्यात बंदी; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा बसला फटका

डेहराडून : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या सुनावणीच्या एक दिवस आधी पतंजलीवर अजून एक मोठे संकट कोसळले आहे. उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की पतंजली आयुर्वेदाच्या १४  उत्पादने/औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. पतंजली आयुर्वेदला वेळोवेळी नोटिसाही बजावण्यात आल्याचेही परवाना प्राधिकरणाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आता ३०  एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे. पतंजलीचे सह-संस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण देखील या सुनावणीस उपस्थित राहणार आहेत.Patanjali Divya Pharmacy's five drugs placed under production ban

 उत्तराखंड परवाना प्राधिकरणाने औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९५४ च्या कलम १५९ (१ ) अंतर्गत दिव्या फार्मसीच्या १४ उत्पादनांवर बंदी घातली आहे. दिव्या फार्मसी ही पतंजलीच्या मालकीची कंपनी आहे. ज्या उत्पादनांवर किंवा औषधांवर बंदी घालण्यात आली आहे त्यात श्वासरी गोल्ड, श्वासरी वटी, ब्रॉन्कॉम, श्वासरी प्रवासी, श्वासरी आवलेह, मुक्ता वटी एक्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत ॲडव्हान्स, लिवोग्रिट, आयग्रिट गोल्ड पत्ती, डॉ. आय ड्रॉप यांचा समावेश आहे.Patanjali 14 products banned

Patanjali 14 products banned

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी पतंजलीच्या माफीबाबत ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. २३  एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान रामदेव आणि बाळकृष्ण यांनी सांगितले होते की, त्यांना माफीनामा पत्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. पतंजलीच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी माफीनामा पत्र ६७ वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे सांगितले होते.Patanjali Shares in Deep Red: Supreme Court Bans Patanjali Advertisements

२७  फेब्रुवारी रोजी न्यायालयाने पतंजलीच्या आरोग्याशी संबंधित जाहिरातींवर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले होते. कंपनीवर कारवाई का करू नये, अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली होती. पतंजली आपल्या जाहिरातींद्वारे संपूर्ण देशाची दिशाभूल करत आहे, असे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते. यानंतर रामदेव आणि बाळकृष्ण यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.Uttarakhand cancels licences of 14 Patanjali products for misleading  advertising - India Today

सुप्रीम कोर्टाने उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाकडून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींची माहिती मिळाल्यानंतर पतंजलीवर काय कारवाई केली याचे उत्तरही मागवले होते. प्राधिकरणाने फाइल पुढे पाठवण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.Yoga Guru Baba Ramdev's Traditional Remedies Take on Big Brands in India -  WSJ

आता ज्या औषधांवर कारवाई करण्यात आली त्यापैकी मधुग्रीट, इग्रिट गोल्ड, लिपिडॉम, बीपी ग्रिट या औषधांवरही नोव्हेंबर २०२२ मध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र, आठवडाभरातच परवाना प्राधिकरणाने ही बंदी मागे घेतली. नजरचुकीमुळे औषधांच्या निर्मितीचे काम बंद पडल्याचे प्राधिकरणाने तेव्हा म्हटले होते. नवीन आदेशात म्हटले आहे की दिव्या फार्मसी पूर्वीप्रमाणेच बंदी घातलेली १४ औषधे वगळता इतर औषधांचे उत्पादन सुरू ठेवू शकते. Entire country is taken for a ride: SC contempt notice to Patanjali on ads  | Company News - Business Standard