रुबी रेसिडन्सीप्रकरणी कंत्राटदाराविरोधात आरोप निश्चिती

दोन बिल्डर्स व सरकारी अधिकारी दोषमुक्त, मडगाव सत्र न्यायालयाचा निवाडा, काणकोणात चालणार खटला


20th November 2017, 08:17 pm
रुबी रेसिडन्सीप्रकरणी कंत्राटदाराविरोधात आरोप निश्चिती
चावडी काणकोण येथील रुबी रेसिडन्सी इमारत दुर्घटनाप्रकरणी कंत्राटदार विशाल देसाईविरोधात काणकोण प्रथम श्रेणी न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. या घटनेशी संबंधित दोन बिल्डर्स तसेच सरकारी अधिकाऱ्यांना मडगाव सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.
४ जानेवारी २०१४ साली चावडी येथे उभारण्यात येत असलेली रुबी रेसिडन्सी ही तीन मजली निर्माणाधीन इमारत कोसळून १५ जण ठार झाले होते. या प्रकरणी बिल्डर व कंत्राटदारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता केवळ कंत्राटदार विशाल देसाईविरोधात आरोप निश्चित करण्यात आले असून, काणकोण प्रथम श्रेणी न्यायालयात खटला चालणार आहे.