दिवाडी येथील कोटीतीर्थावर मुख्यंमंत्र्यांच्या हस्ते गंगा पूजन, उदकशांती

श्रीपाद नाईक, दामू नाईक यांची उपस्थिती; तीर्थावर जाण्यासाठी फेरी, शटलची सोय; दिवाडी येथील पवित्र कोटीतीर्थावर गोकुळाष्टमीच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि प्रदेश भाजप अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी गंगा पूजन व उदकशांती केली. धार्मिक वातावरणात हा विधी पार पडला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
दिवाडी येथील कोटीतीर्थावर मुख्यंमंत्र्यांच्या हस्ते गंगा पूजन, उदकशांती

पणजी : दिवाडी येथील पवित्र कोटीतीर्थावर गोकुळाष्टमीच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि प्रदेश भाजप अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी गंगा पूजन व उदकशांती केली. धार्मिक वातावरणात हा विधी पार पडला.


कोटीतीर्थाच्या पावित्र्याला साजेसा हा विधी भक्तिभावाने पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पूजन करून तीर्थक्षेत्राच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला उजाळा दिला. कोटीतीर्थ कोरिडोर विकास प्रकल्पांतर्गत गोवा सरकारच्या पुरातत्त्व विभाग आणि श्री सप्तकोटेश्र्वर कोटीतीर्थ जीर्णोद्धार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १ वाजता प्रसाद झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 

फेरी, शटल बसची सोय 

दिवाडी येथे जाण्यासाठी ओल्ड गोवा व रायबंदर येथून विशेष फेरीची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवाडी फेरी धक्क्यावरून पोर्ने तीर्थ येथे जाण्यासाठी शटल बसची सोय करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जीर्णोद्धार समितीचे संयोजक डॉ. भूषण भावे आणि पुरातत्त्व विभागाचे सचिव प्रसाद लोलयेकर यांनी केले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा