काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १७ ऑगस्टला गोव्यात

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १७ ऑगस्ट रोजी गोव्यात येत असून वर्णा येथे बीएलए आणि बूथ कार्यकर्त्यांच्या परिषदेला संबोधित करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या संघटन मजबुतीचा मंत्र देणार आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १७ ऑगस्टला गोव्यात

पणजी :काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १७ ऑगस्ट रोजी गोवा दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खर्गे यांचा हा पहिलाच गोवा दौरा असून, या वेळी ते दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे आयोजित भव्य बीएलए आणि बूथ कार्यकर्त्यांच्या परिषदेला संबोधित करतील, अशी माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनी दिली आहे. 

 आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यभरात संघटन मजबुतीकरण आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून ही राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे  हा कार्यक्रम १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता वेर्णा येथील 'क्विंटा दे वालादारेस' (Quinta de Valadares) सभागृहात पार पडणार आहे. 

या परिषदेला संपूर्ण गोव्यातून काँग्रेसचे बीएलए, बूथ अध्यक्ष आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत पक्षाचे इतर केंद्रीय आणि राज्यातील प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित राहतील.  काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असून, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह फुंकण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी खर्गे या परिषदेतून मार्गदर्शक दिशा देतील, असा विश्वास पक्षसूत्रांनी व्यक्त केला आहे.  

हेही वाचा
सर्व पहा