केटीएम दुचाकीच्या धडकेत नावेलीत पितापुत्र जखमी; चालकावर मडगाव पोलिसांत गुन्हा

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
केटीएम दुचाकीच्या धडकेत नावेलीत पितापुत्र जखमी; चालकावर मडगाव पोलिसांत गुन्हा

मडगाव : नावेली येथे केटीएम दुचाकी वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरील दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील पितापुत्र जखमी झाले असून, याप्रकरणी संशयित केटीएम चालक तौसीफ शेख (रा. नावेली) याच्याविरोधात मडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात कोलमोरोड-नावेली येथील ओडिसी इमारतीजवळ १० ऑगस्ट रोजी रात्री ७.५२ वाजण्याच्या सुमारास घडला. नावेली येथील रहिवासी तौसीफ शेख हा आपल्या ताब्यातील केटीएम मोटारसायकल अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवत होता. या दरम्यान त्याने समोरून जाणाऱ्या पॅशन प्रो दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेमुळे पॅशन प्रो दुचाकीचालक रमाकांत मोहिते (रा. नावेली) आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा हे दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन जखमी झाले. अपघातानंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी तातडीने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.

या अपघातप्रकरणी मडगाव पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी संशयित तौसीफ शेख याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिंगुएल वाझ करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा