
पणजी : गोव्यातील दोन जिल्हा निबंधक आणि एका नागरी उपनिबंधकाची बदली झाली आहे. त्यात उत्तर जिल्ह्याचे निबंधक (नागरी निबंधक तथा उपनिबंधक बार्देश, अतिरिक्त ताबा) सूरज वेर्णेकर यांच्याकडे उत्तर जिल्ह्याच्या निबंधक पदाबरोबरच दक्षिण जिल्हा व कुशावती जिल्ह्याचे जिल्हा निबंधक म्हणून अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. दक्षिण जिल्ह्याचे निबंधक (कुशावती जिल्ह्याच्या निबंधक पदाचा व नागरी निबंधक तथा उपनिबंधक पदाचा अतिरिक्त ताबा) डॉ. गौरेश बुगडे यांची सिव्हील निबंधक तर उपनिबंधक सासष्टी (सिव्हील निबंधक तथा उपनिबंधक -१ अतिरिक्त ताबा) म्हणून बदली करण्यात आली आहे. सासष्टीचे संयुक्त नागरी निबंधक तथा उपनिबंधक -१ किरण मेस्त यांची बार्देशचे सिव्हील निबंधक तथा उपनिबंधक म्हणून बदली करण्यात आली आहे. सूरज वेर्णेकर (अतिरिक्त ताबा) यांच्या जागी त्यांची बदली करण्यात आली आहे.