मुजफ्फरपूर येथे रुग्णालयात भीषण आग, ४ जणांचा मृत्यू २० जण जखमी

दिल्लीतील हॉटेलच्या आगीनंतर दुसरी आगीची दुर्घटना

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26 mins ago
मुजफ्फरपूर येथे रुग्णालयात भीषण आग, ४ जणांचा मृत्यू २० जण जखमी

पटणा : बिहारमधील मुजफ्फरपूर येथील एका रुग्णालयात गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याने आयसीयू (ICU) मधील किमान ४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. 

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग काही क्षणांतच आयसीयू विभागात पसरली. दाट धुरामुळे रुग्ण, नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली व रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू केले.जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचून बचाव आणि स्थलांतर प्रक्रियेवर लक्ष ठेवत होते.

दिल्लीमधील हॉटेलच्या आगीनंतर दुसरी आगीची दुर्घटना

दरम्यान, एक दिवसापूर्वीच दिल्लीतील मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, या सलग घडलेल्या दुर्घटनांमुळे रुग्णालये आणि व्यावसायिक इमारतींमधील अग्निसुरक्षेच्या नियमांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा