आरजीच्या सर्व ‌विधानसभा मतदारसंघांतील गट समित्या बरखास्त

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
आरजीच्या सर्व ‌विधानसभा मतदारसंघांतील गट समित्या बरखास्त

पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या ( Revolutionary Goans Party (आरजी))कार्यकारिणी समितीने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील गट समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी जारी केले आहेत.

पक्ष संघटनेत नव्याने फेररचना करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात नवीन कार्यकारिणी आणि गट समित्यांची पुनर्नियुक्ती करण्यात येणार असल्याचीही माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

या निर्णयामुळे आरजीपीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः अलीकडील पक्षातील घडामोडी आणि नेतृत्वातील बदलांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे महत्त्वाच्या राजकीय घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा