बोर्डे-डिचोलीतील सिया कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
बोर्डे-डिचोलीतील सिया कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग

पणजी :  डिचोली तालुक्यातील बोर्डे येथील सिया कॉम्प्लेक्स इमारतीतील एका फ्लॅटला अचानक आग लागून आतील सामान जळून खाक झाले. घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. 

घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशामक दलाने (Bicholim Fire Station)  तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग इतर फ्लॅटमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

या आगीत संबंधित फ्लॅटमधील मोठे नुकसान झाले असले, तरी अग्निशामक दलाने वेळीच धाव घेऊन लाखो रुपयांची मालमत्ता वाचविली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. नेमके किती नुकसान झाले याची माहिती अग्न‌िशमन दल घेत आहे. 

हेही वाचा