बोरी,फोंडा येथे भीषण अपघात : कंटेनरची स्कूटरला धडक; महिला ठार, एक जखमी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
23 mins ago
बोरी,फोंडा येथे भीषण अपघात : कंटेनरची स्कूटरला धडक; महिला ठार, एक जखमी

फोंडा : फोंडा-मडगाव (Borim-Ponda) मार्गावर बोरी येथे गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून; आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. भरधाव कंटेनरने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

बोरी येथील श्री साईबाबा मंदिराजवळ (Shri Saibaba Temple, Borim)  घडलेल्या या अपघातानंतर चालक कंटेनरसह घटनास्थळावरून फरार झाला.  मात्र; पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित कंटेनरचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

अपघातानंतर काही काळ फोंडा-मडगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून; फोंडा पोलीस (Ponda Police) पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा