वडिलांच्या कॉम्प्युटरवर इन्स्टाग्राम-रॅडिट अकाऊंट बनवून तरुणीची बदनामी

दक्षिण गोव्यातील तरुणाचा धक्कादायक कारनामा उघड; आई-वडिलांची अटकपूर्व जामिनासाठी धाव.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15 mins ago
वडिलांच्या कॉम्प्युटरवर इन्स्टाग्राम-रॅडिट अकाऊंट बनवून तरुणीची बदनामी

पणजी: दक्षिण गोव्यातील एका युवकाने आपल्या आई-वडिलांच्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचा गैरवापर करून एका तरुणीला सोशल मीडियावर बदनाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संशयित युवकाने पीडित तरुणीचे बनावट इन्स्टाग्राम आणि 'रॅडिट' खाते तयार करून त्यावर तिचे मॉर्फ्ड (छेडछाड केलेले) फोटो आणि लैंगिकदृष्ट्या आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. याप्रकरणी सायबर पोलीस विभागाने संशयितावर गुन्हा दाखल केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तरुणाने केवळ तरुणीचीच नव्हे, तर तिच्या पालकांविषयीदेखील अत्यंत खालच्या थराची विधाने आणि टिप्पण्या ऑनलाइन प्रसिद्ध केल्या. या कृत्यामुळे पीडित तरुणीच्या सामाजिक प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. सायबर विभागाने तपासाअंती या गुन्ह्यात वापरलेली उपकरणे ही संशयिताच्या पालकांची असल्याचे निष्पन्न केले आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेच्या भीतीने संशयिताच्या आई-वडिलांनी मेरशी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता ८ जून रोजी पुढील सुनावणी होईल. 

बातमी अपडेट होत आहे.. 

हेही वाचा