पर्यटन खात्याकडून कळंगुट परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
30 mins ago
पर्यटन खात्याकडून कळंगुट परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई

पणजी : कळंगुट-बागा परिसरात अतिक्रमण करून उभारलेली शॅक तसेच इतर बांधकामांवर कारवाई करण्यास पर्यटन खात्याने सुरू केले आहे. जी शॅक अतिक्रमण करून बांधली होती; ती मंगळवारी पोलीस बंदोबस्तात मोडून टाकण्यास सुरूवात केली आहे. 

 उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू आहे, अशी माहिती पर्यटन खात्याच्या पर्यटन खात्याच्या (Tourism Department) अधिकाऱ्यांनी दिली. मिनीनो फर्नांडीस यांच्या जनहित याचिकेवर गोवास्थित मुंबई उच्च नयालयाने  कळंगुट, बागा परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

कळंगुट – कांदोळी (Calangute -Candolim)  समुद्रकिनारा परिसरात ७० जणांनी अतिक्रमण केल्याची माहिती याच्यापूर्वी पर्यटन संचालकांनी (Tourism Director)  उच्च न्यायालयाला (High Court)  दिली होती. कारवाई करण्याविषयी त्यांना नोटीसा सुद्धा जारी केल्या होत्या. उपगृह तंत्रज्ञानाच्या मदतीने कांदोळी- कळंगुट परिसरातील १२ भागांमधील ३ भागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. इतर भागांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर पुढील कारवाई होणार. 

सर्वेक्षण संचालनालयाने ५ सप्टेंबर २०२२ या दिवशी कांदोळी आणि कळंगुट समुद्रकिनारा परिसरात सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षण केल्यानंतर सुद्धा समुद्रकिनारा परिसर तसेच सरकारी जाग्यांवर अतिक्रमण सुरू आहे. या अतिक्रमणावर कसलीच कारवाई होत नाही, असा दावा करीत मिनीनो फर्नांडिस यांनी जनहीत याचिका दाखल केली आहे. या जनहीत याचिकेवर सुनावणी होऊन कारवाईचा आदेश जारी केला आहे.

हेही वाचा