शांततेकडे की संघर्षाकडे?; जगाचे लक्ष

इस्लामाबाद : उत्तर इस्त्रायलमध्ये (Israel) सायरनचा आवाज घुमतोय आणि मध्यपू्र्वेतील तणाव अधिकच तीव्र झाला आहे. दुसरीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील महत्त्वपूर्र चर्चा आज इस्लामाबाद (Islamabad ) येथे सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या युद्धविरामाचे रूपांतर कायमस्वरूपी शांततेत होणार की; तणाव पुन्हा वाढणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तानमध्ये ‘मेक ऑर ब्रेक’ टप्पा : शरीफ
या चर्चेचे यजमान पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ही बैठक ‘मेक ऑर ब्रेक’ टप्पा असल्याचे म्हटले आहे. तात्पुरत्या युद्धविरामानंतर आता कायमस्वरूपी शांततेकडे वाटचाल करणे ही मोठी कसोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इराणचा सावध सूर; अटी पूर्ण झाल्याशिवाय चर्चा कठीण
इराणच्या (Iran) ७१ सदस्यीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करत असून; ते इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत.
गालिबाफ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिके सोबतच्या आधीच्या चर्चांचा अनुभव “अपयशी आणि विश्वासघाताचा” राहिला आहे.. त्यामुळे संवादासाठी तयारी असली तरी विश्वासाचा अभाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
इराणने चर्चेसाठी काही अटी ठेवल्या आहेत.
लेबनॉनमध्ये (Lebanon) युद्धविराम
इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे
या अटी पूर्ण न झाल्यास शांतता प्रक्रियेला धक्का बसू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
अमेरिकेची कठोर भूमिका
अमेरिकेचे (US) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) कोणत्याही परिस्थितीत खुली ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स हे चर्चेसाठी इस्लामाबादकडे रवाना झाले असून; त्यांच्या सोबत जॅरेड कुशनर आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ सहभागी होणार आहेत.
पार्श्वभूमी : नाजूक युद्धविराम आणि वाढता तणाव
या चर्चेपूर्वी अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांचा नाजूक युद्धविराम लागू आहे. मात्र, लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात हजारो लोकांचा बळी गेला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कोणताही औपचारिक युद्धविराम करार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शांततेकडे की संघर्षाकडे?
इस्लामाबादमधील ही बैठक मध्यपूर्वेतील दीर्घकालीन संघर्ष संपवण्यासाठी निर्णायक ठरू शकते. तात्पुरत्या युद्धविरामाचे रूपांतर कायमस्वरूपी शांततेत होणार की; तणाव पुन्हा वाढणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.