मोबोरमध्ये जुन्या मासेमारी बोटीला आग

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
17 mins ago
मोबोरमध्ये जुन्या मासेमारी बोटीला आग

मडगाव :  दक्षिण गोव्यातील (South Goa)  मोबोर (Mobor) येथील खाजगी जेटीवर उभ्या असलेल्या जुन्या मासेमारी बोटीला आग लागल्याची घटना घडली. यात बोटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून; कुंकळळी अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण आणले. 

 मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट मोबोर येथील एका खाजगी जेटीवर उभी करून ठेवण्यात आली होती. बोटीची दुरुस्ती करावयाची असल्याने ती जेटीवर उभी केलेली होती असे बोटमालक जुवाव फर्नांडिस यांनी सांगितले. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच कुंकळळी (Cuncolim) येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली ही जुनी बोट पूर्णपणे जळून खाक झाली होती. दरम्यान, या आगीच्या घटनेवेळी अग्निशामक दलाची गाडी कुंकळळी येथे नाक्यावरील वाहतूक कोंडीत अडकून पडली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटानंतर वाट काढत गाडी घटनास्थळी पोहोचली, असे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.

हेही वाचा