धावे, वाळपई येथे काजू बागायतीला आग; ५० हजार रुपयांचे नुकसान

१ लाख रुपयांची मालमत्ता वाळपई अग्न‌िशमन दलाने वाचवली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
30 mins ago
धावे, वाळपई येथे काजू बागायतीला आग; ५० हजार रुपयांचे नुकसान

वाळपई : चिरेखाण-धावे, वाळपई (Valpoi) येथील काजू बागायतीला ऐन काजू मौसमात आग लागली. त्यात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.  १ लाख रुपयांची मालमत्ता वाळपई अग्निशमन दलाने (Valpoi Fire station) वाचवली.

आग लागल्याची माहिती मिळताच वाळपई अग्न‌िशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. काजू बागायतीत (Cashew plantation) पसरलेली आग अग्न‌िशमन दलाने कसोशिचे प्रयत्न करून विझवली. अग्न‌िशमन दलाचे अधिकारी डी. एस. सावंत, ए. व्ही. नाईक, जी.डी. पावणे, ए. ए. शेटकर यांनी आग विझवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आग लागलेली काजू बागायत धनंजय मराठे यांच्या मालकीची आहे. 

हेही वाचा