म्हापशातील व्यापाऱ्यांचा उद्या ‘शटर डाऊन’ मोर्चा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
म्हापशातील व्यापाऱ्यांचा उद्या ‘शटर डाऊन’ मोर्चा

म्हापसा : म्हापसा मार्केटमधील (Mapus Market)  व्यापाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याचा आरोप करीत व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकार आणि पालिका प्रशासन (Muncipal administration)  या दोघांनीही या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हापसा व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे. एकूण या प्रकाराच्या निषेधार्थ उद्या बुधवारी ८ एप्र‌िलला म्हापसातील व्यापाऱ्यांनी ‘शटर डाऊन’ मोर्चाची हाक दिली आहे. 

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पालिका मुख्याधिकारी (Chier Officer) थकीत रकमेच्या नावाखाली व्यापाऱ्यांची छळवणूक करीत असून, वारंवार दबाव टाकला जात आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, या प्रकाराच्या निषेधार्थ उद्या (८ तारखेला) म्हापसा मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सर्व व्यापारी एकत्र येत पालिका कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती म्हापसा व्यापारी संघटनेने (Mapusa traders association)  दिली आहे.

व्यापाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा