एमपीएच्या जागेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवा : उच्च न्यायालय

आमदार आमोणकर यांना केले प्रतिवादी; पुढील सुनावणी ४ मे रोजी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
एमपीएच्या जागेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवा : उच्च न्यायालय

पणजी :  मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए)  (MPA) मालकीच्या जागेत उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने (High Court) दिले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावून पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

या याचिकेच्या अनुषंगाने आमदार संकल्प आमोणकर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे व त्यांना न्यायालयाने नोटीस (Notice)  बजावली आहे. प्रकरणातील सर्व बाजू ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने पुढील सुनावणी ४ मे रोजी ठेवली आहे. दरम्यान, पुढील सुनावणीत या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा