घरचे बोलल्याने ९ व्या मजल्यावरून उडी घेऊन केली आत्महत्या; गाझियाबाद येथील घटनेने खळबळ

गाझियाबाद : ऑनलाईन गेमच्या (Online Game) आहारी गेलेल्या ३ सख्ख्या बहिणींनी आत्महत्या (3 minor sisters die by suicide) करण्याची मन सुन्न करण्याची घटना गाझियाबाद, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे घडली आहे. ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे घरचे बोलल्याने या तिघाही बहिणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. इमारतीच्या व्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा अकाली संपवली. ‘भारत सिटी’ (Bharat City) या निवासी टाऊनशिपमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
आत्महत्या केलेल्या बहिणींची नावे विंशिका (१६ वर्षे), प्राची (१४ वर्षे) आणि पाखी (१२ वर्षे) अशी आहेत. तिन्ही बहिणी एकमेकांवर जीवापाड प्रेम करायच्या व नेहमी एकत्र असायच्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्या होत्या.
पोलिसांच्या (Police) तपासानुसार; कोविड काळात त्यांना ऑनलाईन गेमचे व्यसन लागले. तिघीही बहिणी टास्कवर आधारित एका कोरियन ऑनलाईन गेमच्या व्यसनात गुरफटल्या होत्या.
व्यसनापायी त्यांचे अभ्यासाकडे लक्ष नव्हते व शाळाही चुकवत होत्या. त्यामुळे पालकांनी त्यांना गेम खेळण्यास विरोध करून रोखले. त्या रागातून या तिन्ही बहिणींनी टोकाचे पाऊल उचलत आत्हमत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास केला. एकाच वेळी तीन बहिणींनी आत्महत्या केल्याने या परिसरात शोककळा पसरली आहे.