सप्तसुर सांस्कृतिक संगीत विद्यालय, नार्वे प्रस्तुत 'दानव' या नाटकाने होणार स्पर्धेला सुरुवात.

पणजी : गोव्यातील (Goa) कला अकादमी पणजीतर्फे (Kala Academy Panjim) आयोजित ५६ वी ‘ब’ गट २०२५-२६ नाट्यस्पर्धेचे (Drama) वेळापत्रक जाहीर झाले आहे. साखळी येथील रवींद्रभवनात (Ravindra Bhavan) ९ फेब्रुवारी पासून संध्याकाळी ७ वाजल्यापासून स्पर्धा सुरू होणार आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
९ फेब्रुवारी : सप्तसुर सांस्कृतिक संगीत विद्यालय, नार्वे, डिचोली, नाटक: दानव, लेखक, अतुल साळवी.
१० फेब्रुवारी : श्री सिद्धेश्वर, हरमल, पेडणे, नाटक: मी नथुराम गोडसे बोलतोय, लेखक, प्रदीप दळवी.
११ फेब्रुवारी : सिद्धी क्रीडा आणि सांस्कृतिक संस्था, पोंबुर्फा, बार्देश, नाटक: सूर राहू दे, लेखक, श. ना. नवरे.
१२ फेब्रुवारी : रवळनाथ युनिटी स्पोर्ट्स अॅण्ड कल्चरल क्लब, तळर्ण, पेडणे, नाटक: दुसरा पेशवा, लेखक, वि.वा. शिरवाडकर.
१३ फेब्रुवारी : श्री पांडुरंग प्रासादिक नाट्य मंडळ, विठ्ठलापूर, साखळी, नाटक: शांतता! कोर्ट चालू आहे, लेखक, विजय तेंडुलकर.
१६ फेब्रुवारी : होमकुंड रंगभूमी, मडकई, फोंडा, नाटक: सिमेवरून परत जा, लेखक, बाळ कोल्हटकर.
१७ फेब्रुवारी : ओम कला सांस्कृतिक केंद्र, हळर्ण, पेडणे, नाटक: अपराजित योद्धा, लेखक, नरेंद्र नाईक.
१८ फेब्रुवारी : श्री शांतादुर्गा संगीत कला मंच, नानोडा, डिचोली, नाटक: काळोख देत हुंकार, लेखक, दिलीप परदेशी.
२३ फेब्रुवारी : गौरी तनय कला संघ, धोणशी, नागेशी, फोंडा, नाटक: लॉगआऊट, अनुवाद: हर्षदा सुहास डोंगरे, मूळ लेखक: डॉ. तन्वी कामत बांबोळकर.
२४ फेब्रुवारी : शिवगणेश कला आणि सांस्कृतिक मंडळ, हळर्ण, पेडणे, नाटक: नवमीच्या मध्यरात्री, पु.शि. नार्वेकर.
२५ फेब्रुवारी : श्री भुमिका नाट्य मंडळ, पर्ये मठ, साखळी, नाटक: चाणक्य विष्णुगुप्त, लेखक, गोविंद पुरुषोत्तम देशपांडे.
२६ फेब्रुवारी : श्री साई दिगंबर क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ, आसगांव, बार्देश, नाटक: प्रिजनर्स ऑफ वॉर, प्रसाद प्रेमानंद कळंगुटकर.
२७ फेब्रुवारी : दुर्वांकुर कला केंद्र, हरमल, पेडणे, नाटक: करीन ती पुर्व, लेखक, भा. वि. वरेरकर.
२ मार्च : ललितप्रभा नाट्यमंडळ, वळवई, फोंडा, नाटक: हिरा हरपला, लेखक, रा.रा. शांताराम गोपाळ गुप्ते.
५ मार्च : माऊली क्रिएशन, इब्रामपूर, पेडणे, नाटक: अधांतर, लेखक, जयंत पवार.
६ मार्च : कलाकार कला मंच, मयडे, बार्देश, नाटक: अपह्रत, लेखक, दयाराम पाडलोस्कर.
९ मार्च : जुनस युनायटेड कल्चरल अॅण्ड स्पोर्टस् क्लब, मांद्रे, पेडणे, नाटक: हिच तर प्रेमाची गम्मत आहे, लेखक, अशोक पातोळे.
१० मार्च : नागेश कला मंच, नागेशी, बांदोडा, फोंडा, नाटक: इन सर्च ऑफ, लेखक, गौतम अनंत गावडे.
१२ मार्च : वेदांत एंटरटेनमेंट, वाळपई, सत्तरी, नाटक: महाबळी, लेखक, दशरथ मांद्रेकर.
१३ मार्च : ॐ कलासृष्टी, बांदोडा, फोंडा, नाटक: रायगडाला जेव्हा जाग येते, लेखक, वसंत कानेटकर.