मंत्री सुभाष फळदेसाई : १२ तास अखंड पाणी पुरवठा करण्याचे सरकारचे ध्येय

मडगाव : सध्या गोव्यातील (In Goa) २६ टक्के लोकसंख्येला (To the population) २४ तास पाणी पुरवठा (Water supply) मिळत आहे. पुढील सहा महिन्यांच्या काळात ही टक्केवारी ४० टक्के करावयाची आहे. तर वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण राज्याला १२ तासांपेक्षा जास्त काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे ध्येय आहे, मंत्री सुभाष फळदेसाई (Minister Subhash Phaldesai) यांनी स्पष्ट केले
मडगाव येथे कार्यक्रमासाठी आलेल्या समाजकल्याण व पेयजल मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पुढील वर्षापर्यंत राज्य टँकरमुक्त करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, जलजीवन मिशनअंतर्गत नुकतीच देशातील सर्व राज्यांची बैठक झाली होती. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पायाभूत सुविधा शाश्वत असाव्यात यासाठी ही परिषद होती. यातून ग्रामीण भागात आवश्यक पायाभूत सुविधा उभारणी केल्यास त्यांनाही पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवणार नाही. पायाभूत सुविधांच्या उभारणीनंतर त्या स्थानिक स्वराज संस्थांकडे पुढे चालवण्यासाठी देण्यात याव्यात अशी नियमावली आहे. मात्र, गोव्याचा विचार करत इतर राज्यांपेक्षा चांगले काम राज्यात झाले आहे. इतर राज्यात ५५ लिटर प्रति व्यक्ती पाण्याची टंचाई आहे. पण गोव्यातील टक्केवारी लक्षात घेता हे प्रमाण प्रतिव्यक्ती १५० लिटर जास्त आहे. या परिषदेत पाण्याच्या सुविधा वाढवण्यासाठी निधीची मागणीही केली आहे. गोवा हे मॉडेल राज्य म्हणून विशेष लक्ष देण्यात यावे व याठिकाणी आवश्यक साधनसुविधांची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी जलशक्ती मंत्रालयाकडेे केल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.
राज्यातील जलप्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची तपासणी केली जाते. कोणत्याही प्रकारे अशुध्द पाणी दिले जाऊ नये, यासाठी प्रयत्न आहेत. येत्या ६ महिन्यांत राज्याचा पाणी पुरवठा १ हजार एमएलडीपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. एप्रिल २०२६ पर्यंत नवीन पाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाणी टंचाईच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जुन्या वाहिनी बदलून डिजिटल मीटरवर बसवणार
राज्यातील सुमारे ५० टक्के जलवाहिन्या ४० ते ६० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. त्या बदलण्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. तसेच पाण्याचा अचूक वापर आणि दाबाची माहिती मिळावी यासाठी आता डिजिटल मीटर्स बसवण्यावर भर दिला जात आहे, असेही मंत्री फळदेसाई म्हणाले.
टँकरची संख्या १०० वरून २४ वर
गेल्या दोन वर्षांत पाणी पुरवठ्यात सुधारणा झाल्यामुळे अनेक भागांत टँकरची संख्या १०० वरून २४ पर्यंत खाली आली आहे. कुठेतरी जलवाहिनी फुटल्यास किंवा ज्या डोंगराळ भागात अजूनही पाण्याचा पुरवठा होत नाही, त्याठिकाणी टँकरचा वापर केला जात आहे. पुढील वर्षभरात राज्य पूर्णपणे टँकरमुक्त होईल, असेही मंत्री फळदेसाई म्हणाले.