नानोडा येथील काजू बागायतीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st January, 11:35 pm
नानोडा येथील काजू बागायतीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

डिचोली : नानोडा लाटंबार्से गावातील शेतकरी एकनाथ सावळ यांच्या काजू बागायतीला भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आगीत काजूची झाडे जळून खाक झाली असून शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचू शकले नाही. स्थानिकांनी व जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

आगीत एकनाथ सावळ यांच्या काजूच्या अनेक कलमांचे व लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

हेही वाचा