जुने गोवे येथे वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दोन महिलांची सुटका

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th January, 04:31 pm
जुने गोवे येथे वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

पणजी: 'मानवी तस्करी विरोधी दिना'च्या पूर्वसंध्येला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुने गोवे परिसरात मोठी कारवाई करत एका संघटित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान दोन पीडित महिलांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला होता. 

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, हा एक संघटित रॅकेट असून अज्ञात एजंट्समार्फत महिलांची भरती करून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जात होते. गुन्हे शाखेने याप्रकरणी भा. न्या. सं आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

या मोहिमेत पोलिसांनी अन्याय रहित जिंदगी या एनजीओची मदत घेतली.  दोन्ही पीडित महिलांची मेरशी येथील महिला सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील संघटित रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीस राबवत आहेत. 

हेही वाचा