मासळीमधील धातूंचे प्रमाण; तज्ज्ञांच्या अहवालानंतर सरकार करणार कारवाई : मंत्री हळर्णकर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th January, 11:28 am
मासळीमधील धातूंचे प्रमाण; तज्ज्ञांच्या अहवालानंतर सरकार करणार कारवाई : मंत्री हळर्णकर

पणजी : करंझाळे समुद्रकिनाऱ्यावरील (Caranzalem Beach) मासळीमध्ये (Fish) जड धातूंचे दूषित अंश जास्त असल्याच्या गोवा विद्यापिठातील (Goa University) संशोधकांच्या अहवालानंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्याला असलेल्या धोक्याच्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची वैज्ञानिक तपासणी केली जात असल्याचे व राज्य सरकार केवळ तज्ज्ञांच्या निष्कर्षांच्या आधारावरच कारवाई करणार असल्याचे मत्स्यव्यवसायमंत्री (Fisheries Minister) निळकंठ हळर्णकर यांनी सांगितले. 

यासंदर्भात माहिती देताना मंत्री हळर्णकर यांनी सांगितले की, सध्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) (NIO) आणि गोवा विद्यापीठाकडून अभ्यास केला जात आहे. त्यात मासळीमधील जड धातूंसंबंधित मूल्यांकनाचा समावेश आहे. “या देशाच्या हितासाठी काम करणाऱ्या प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्था आहेत. जर त्यांचे निष्कर्ष काही हानी दर्शवत असतील, तर सरकार योग्य ती कारवाई करेल,” असे ते म्हणाले. राज्य सरकार केवळ अटकळ किंवा पडताळणी न केलेल्या दाव्यांवर अवलंबून राहणार नाही आणि आपले निर्णय पूर्णपणे वैज्ञानिक पुरावे आणि तज्ञांच्या शिफारशींवर आधारित असतील असे त्यांनी स्पष्ट केले. 

मंत्र्यांनी पुढे सांगितले की, मत्स्य खाते लवकरच मासेमारीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि किनारपट्टीवरील बेकायदेशीर कारवायांवर कारवाई करण्यासाठी पाळत ठेवणारे ड्रोन तैनात करेल. गोव्याच्या हद्दित येऊन मासेमारी करीत असलेल्या शेजारील राज्यांमधील अनेक ट्रॉलर्सवर कारवाई केली जात आहे व जप्त करण्यात आले आहेत. ड्रोनची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. बोटींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कार्यान्वित केले असल्याचे मंत्री हळर्णकर म्हणाले. 

दरम्यान, गोवा विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या एका वैज्ञानिक अभ्यासातून पुढे आले होते की,  करंझाळे येथे पकडलेल्या आणि सामान्यतः खाल्ल्या जाणाऱ्या अनेक माशांच्या प्रजातींमध्ये धातूंचे प्रमाण जास्त आहे. आणि ते आरोग्यास धोकादायक आहे. सरकारने यावर सखोल अभ्यास करण्याची मागणी पुढे येत होती. त्यासंदर्भात विचारले असता, मंत्री हळर्णकर यांनी वरील माहिती

हेही वाचा