२०२० पासून बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी पोलीस मुख्यालयाकडून तातडीचे आदेश

पणजी: गोवा पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही, त्यांना त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणाहून कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. अखेर, अशा चार उपनिरीक्षकांसह एकूण ६८ पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक (मुख्यालय) यांच्याकडून यासंदर्भात तातडीने आदेश जारी करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२० पासून बदली होऊनही ज्या पोलिसांनी नवीन ठिकाणी कामाचा ताबा स्वीकारला नव्हता, त्या सर्व ६८ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणाहून मुक्त करण्याचा आदेश पोलीस मुख्यालय अधीक्षकांनी जारी केला आहे.

या आदेशामुळे बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नवीन ठिकाणी रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, या कर्मचाऱ्यांनी नव्या जागेवर जाऊन कामाचा ताबा स्वीकारल्यानंतरच त्यांना पुढील पगार मिळेल, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत.