नितीश यांची एनडीए विधिमंडळ नेतेपदी निवड : राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार

भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी सम्राट चौधरी; उपनेतेपदी विजय सिन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
नितीश यांची एनडीए विधिमंडळ नेतेपदी निवड : राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार

पटणा : बिहार येथे २० नोव्हेंबर रोजी नवीन सरकार स्थापन होणार आहे. आज बुधवारी झालेल्या राजकीय घडामोडीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एनडीए नेतेपदी निवड करण्यात आली. (Nitish Kumar unanimously elected as NDA legislature leader). 

एनडीए नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीश कुमार आता राज्यपाल  आरिफ मोहम्मद खान (Governor Arif Mohammad Khan) यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. भाजपच्या (BJP) विधिमंडळ नेतेपदी सम्राट चौधरी (Samrat Choudhary BJPs legislature leader)  यांची तर उपनेतेपदी विजय कुमार सिन्हा यांची (Vijay Kumar Sinha) निवड करण्यात आली. 

२० नोव्हेंबर रोजी नितीश कुमार १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. एनडीए नेतेपदी निवड करण्यापूर्वी त्यांची जद(यू) (JD(U)) विधिमंडळ पक्षाचे नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 एनडीएची एकत्रित रणनीती आणि शिस्तबद्ध समन्वय

जद(यू) प्रमुख व भाजप नेत्यांनी मंगळवारी बिहारमध्ये नवीन सरकारच्या शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला.

शपथ विधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, इतर अनेक केंद्रीय मंत्री आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळातील जागावाटप अंतिम करण्यासाठी आणि विधानसभा अध्यक्षपदावर एकमत निर्माण करण्यासाठी एनडीएच्या भागीदारांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे.

एनडीए विधिमंडळ नेते पदी नितीश कुमार यांची निवड 

अमरनाथ तिवारी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज पटणा येथे एनडीए विधिमंडळ नेते म्हणून एकमताने निवड झाली. राज्य विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या एनडीए आमदारांच्या बैठकीत त्यांची निवड झाली.

एनडीएचे आमदार आता सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनकडे जातील, असे अमरनाथ तिवारी यांनी सांगितले. 

हेही वाचा