विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

मडगाव : लोटली येथील चौगुले कंपनीच्या शिप बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या कामगाराला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला.

मूळ उत्तरप्रदेश येथील जियालाल मिसाळ (३५) हा कामगार चौगुले कंपनीतील शिप बिल्डिंग भागात काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला तत्काळ दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले परंतु, त्याचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. वैद्यकीय अहवालानुसार विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण नमूद करण्यात आले. मायना कुडतरी पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी यांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून घातपाताचा संशय नसल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा