दिल्ली बॉंबस्फोटाशी कनेक्शन; लखनऊतील महिला डॉक्टर शाहीनला अटक : गाडीत सापडले एके -47

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
33 mins ago
दिल्ली बॉंबस्फोटाशी कनेक्शन; लखनऊतील महिला डॉक्टर शाहीनला अटक :  गाडीत सापडले एके -47

नवी दिल्ली :  दिल्लीतील (Delhi) लाल किल्ला (Red Fort) परिसरात कारमध्ये झालेल्या बॉंबस्फोटप्रकरणात डॉक्टर शाहीन शाहिद (Dr. Shaheen Shahid) या महिलेचे कनेक्शन दिसून आले असून, याप्रकरणी पोलिसांनी (Delhi Police)  तिला अटक केली आहे. तिच्या गाडीत एके -47 (Ak- 47)  रायफल व अनेक मॅगझिन सापडली आहेत. 

अटक करण्यात आलेली डॉक्टर शाहीन शाहिद फरिबादच्या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित आहे. फरिदाबाद येथील दहशतवादी कटात अटक करण्यात आलेल्या डॉ. मुझा‌म्मिल शकील याची प्रेयसी व सहकारी होती. 

फरिदाबाद येथे अटक करण्यात आलेली संशयित दहशतवादी डॉ. शाहीन शाहिदचा लखनऊशी संबंध असल्याचे माहिती पुढे आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. शाहीन हिच्या फोनवरून लखनऊ क्रमांकांवर संपर्क असल्याचे पुरावे हाती लागले आहेत.

शाहीन व मुझ्झमिल दोघेही दहशतवादी कारवायांशी जोडले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकारी सांगतात की, डॉ. शाहीनची गाडी डॉ. मुझम्मिल शकीलने वापरली आहे. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे व तपास सुरू आहे. 

मुझाम्म‌िल याच्याकडे सापडलेला कारच्या आरसी बुकची शाहीनच्या नावावर नोंदणी आहे. तसेच तिच्या कारच्या डिकित एके -47 रायफल व अनेक मॅगझिन सापडले आहेत.

शाहीन ही एका प्रतिष्ठित हॉस्प‌िटलात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. तिला अटक केल्यानंतर गुप्तचर संस्था कॉल डिटेल्स, बॅंक व्यवहार व सोशल मीडिया चॅट्सचा कसून तपास करीत आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार शाहीनच्या फोन क्रमांकावरून लखनऊ येथे अनेक क्रमांकांवर संपर्क झाल्याचे दिसून आले आहे. यातील काही नंबर केसरबाग, चौक व लालबाग सारख्या भागातील आहे. 

हेही वाचा