स्फोटकांसहीत अटक केलेल्या डॉक्टरांची तपासणी

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये करण्यात आलेल्या बॉंबस्फोटप्रकरणी (Delhi Red Fort area Blast in Car) पोलिसांनी याप्रकरणातील संशयित डॉक्टर उमर मोहम्मद (Dr.Umar Mohammed ) याचे दोन भाऊ व आईला ताब्यात घेतले आहे. डीएनए चाचणीसाठी त्यांचे नमुने घेतले जात आहेत.
उत्तर प्रदेश व हरियाणा येथे मोठ्याप्रमाणातील स्फोटकांसहीत अटक केलेले डॉक्टर अदील राथेर (Dr. Adeel Ahmad Rather) व डॉक्टर मुजम्मील शकील (Muzammil Shakeel ) या दोघांचाही दिल्ली स्फोटप्रकरणात तपास करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट झाल्यानंतर तपासणीत कार डॉ. उमर मोहम्मदच्या नावे असल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. मुजम्मील शकील व डॉ. अदिल राथेर या दोघांना अटक केली आहे.
अदिल याच्या खोलीतून स्फोटके जप्त करण्यात आली होती. त्याने व आणखी दोघांनी मिळून या स्फोटाचा कट रचला व कारमध्ये डिटोनेटर ठेवले. फरीदाबाद येथे सापडलेले अमोनियम नायट्रेट या स्फोटात वापरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली येथे कारमध्ये झालेल्या स्फोटात एकूण ९ जण मरण पावले तर २० जण जखमी झाले. ह्युंडाई आय २० कारमध्ये हे स्फोट झाले. त्यानंतर दिल्लीत छिन्नविच्छीन मृतदेह व रक्ताचा सडा पडला.
त्यानंतर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी इंटेलिजन्सकडून माहिती मिळवून दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे गोळा करणे सुरू केले.
हरियाणा फरीदाबाद येथील दोन निवासी इमारतींतून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ३ हजार किलो स्फोटके जप्त केल्यानंतर काही तासातच वरील बॉंब स्फोट झाला.
स्फोटकात ३५० किलो अमोनियम नायट्रेटचा समावेश आहे. ते खते तयार करण्यासाठी वापरले जाते व घातक बॉंब म्हणून ओळखले जाते. जम्मू आणि काश्मीरचे निवासी डॉक्टर आदिल राथेर यांच्या खोलीतून ही स्फोटके जप्त करण्यात आली.
स्फोटाच्या तीन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात जैश इ मोहम्मद दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणारे पोस्टर्स लावण्यात आले होते.
श्रीनगर येथेही असे पोस्टर्स दिसून आले होते. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी तपास सुरू केला होता व उत्तर प्रदेश, हरियाणा व दिल्लीत पोहचले होते. स्फोटाच्या प्रकरणात ही माहिती महत्त्वाची ठरणार असून, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी याला ‘व्हाईट कॉलर टॅरर इकोसिस्टम’ म्हणून संबोधले आहे.
डॉ. उमर मोहम्मद याची कारमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणात चौकशी करण्यात येत आहे. स्फोटके सापडल्याप्रकरणी राथेर व शकील या दोघांना उत्तर प्रदेश व हरियाणा येथून अटक केली होती व मोठ्याप्रमाणात स्फोटके जप्त केली होती.