डॉक्टरच्या घरातून ३०० किलो आरडीक्स, एके ४७, मोठा शस्त्रसाठा जप्त

देशभरात खळबळ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 hours ago
डॉक्टरच्या घरातून ३०० किलो आरडीक्स, एके ४७, मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली (New Delhi) : दहशतवादविरोधी एक मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हरयाणातील (Hariyana) फरिदाबादमधील (Faridabad) एका डॉक्टरच्या घरातून जम्मू व काश्मीर पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यात सुमारे ३०० किलो आरडीएक्स (300 Kg RDX) , एके ४७ रायफल (AK-47 Rifale) , जिवंत काडतूसे यांचा समावेश आहे.


जम्मू व काश्मीर पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर डॉक्टरच्या घरावर धाड टाकली. त्यात मोठा शस्त्रसाठा हाती लागला. डॉक्टरचे नाव आदिल अहमद (Adil Ahmed) असे आहे. पोलिसांनी त्याला ७ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहारनपूर येथून अटक केली. आदिलची चौकशी केल्यानंतर त्याने फरीदाबादमध्ये स्फोटके साठवून ठेवल्याची कबुली दिली आहे.


अनंतनागमधील जनरल हॉस्पिटलमध्ये आदिल यापू्र्वी प्रॅक्टिस चालवत होता. २०२४ मध्ये राजीनामा दिला व सहारनपूरमध्ये प्रॅक्टिस करणे सुरू केले. आदिल याने तीन महिन्यांपूर्वी फरीदाबादमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती व तेथे केवळ सामान ठेवले होते. 

धाडीत सापडला मोठा शस्त्रसाठा

खोलीत पोलिसांच्या हाती १४ बॅगा लागल्या. त्यात ३०० किलो आरडीएक्स, एक एके ४७ रायफल, ५ लिटर रसायने, ८४ काडतुसे व दोन स्वयंचलित पिस्तूल यांचा समावेश आहे. 

धाडीच्या वेळी १० ते १२ वाहने घटनास्थळी दाखल झाली. जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा या चार राज्यांशी संबंध आहे का, हे तपासले जात आहे.

दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे पुढे

प्राप्त माहितीनुसार, तीन डॉक्टर एका संघटनेशी संबंधित होते. यात दोन डॉक्टर, आदिल अहमद राथेर  (अनंतनाग),  मुझाम्मिल शकील (पुलवामा) या दोघांना सहारनपूर व फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे.तिसरा डॉक्टर अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. शस्त्रसाठ्यासहीत सापडलेले डॉक्टर अंसार गजवत उल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे पुढे आले आहे. 








हेही वाचा