२९ वाहन क्रमांक प्लेट्स जप्त तर ४ जण ताब्यात

पणजी : बेकायदा दारू तस्करीप्रकरणी (Liquor smuggling) गुन्हा शाखेने (Crime Branch Goa) गोव्यातील (Goa) उसगाव येथे धाड टाकीत मोठी कारवाई केली. त्यात २ कंटेनर, दारू मधून मिळून कोटीचा ऐवज जप्त केला व ४ जणांना ताब्यात घेतले.
त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यातील २९ बनावट वाहन क्रमांक प्लेट्सही जप्त केल्या.
जप्त केलेल्या साठ्यात ७५० एमलच्या १२ बाटल्या असलेली ५१० बॉक्स सापडली आहेत. १८० एमएलच्या १४८ बाटल्यांचा समावेश आहे.
वेगवेगळ्या राज्यातील नोंदणी असलेल्या २९ बनावट वाहन क्रमांक प्लेट्स सापडल्या आहेत. मद्य तस्करी करण्यासाठी या बनावट वाहन क्रमांक प्लेट्स तयार केल्या असाव्यात, असा कयास व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभाग पुढील तपास करीत आहे.