एका खेळाडूचाही मृत्यू

पणजी : गोव्यातील (Goa) बांबोळी येथे मध्यरात्री झालेल्या टॅंकर व ‘रेंट अ कॅब’ यामध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघेजण ठार झाले होते. त्यात ऑल इंडिया सेपक टाक्रॉ असोसिएशनचे अध्यक्ष योगेंद्र सिंग (Yogendra Singh) व खेळाडू अंकित कुमार बलियान यांचा समावेश आहे.
त्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गोवा सेपक टाक्रॉ असोसिएशनने ही अध्यक्ष योगेंद्र सिंग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.