जर्मन शेफर्ड बनला आक्रमक; केला शेजाऱ्यावर हल्ला

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
जर्मन शेफर्ड बनला आक्रमक; केला शेजाऱ्यावर हल्ला

पणजी : पर्वरीतील (Porvorim) पत्रकार कॉलनीतील पाळीव जर्मन शेफर्ड (German Shefard) कुत्रा (Dog) आक्रमक बनतोय. या कुत्र्याने कामगारावर हल्ला केल्याच्या घटनेला पंधरा दिवसही उलटले नाहीत तेवढ्यात त्याच घरातील कुत्र्याने 23 ऑक्टोबर रोजी दुपारी शेजाऱ्यावर हल्ला केला.

कुत्रा अचानक घराचे फाटक उघडून बाहेर आला आणि आपल्या नवर्‍यावर हल्ला केला. चेहर्‍यावर जखम झाली असे सुशीला रॉड्रिग्स यांनी सांगितले.

या घरात तीन हिंस्र कुत्रे असून त्यापैकी दोन जर्मन शेफर्ड आहेत. फाटकाकडे येऊन हे कुत्रे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांवर भुंकतात आणि फाटकावर चढण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे लोक त्या बाजूने फिरायला जाणेही टाळतात. अशी बरीच कुत्री मलमूत्र विसर्जनासाठी मालक घराबाहेर काढतात तेव्हा रस्त्यावरून आणि पदपथावरून चालणाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. कुत्र्याबरोबर सोबतचा माणूस कसातरी फरफटत चालत असतो. कुत्राच त्यांना ओढून नेत असतो असे चित्र अनेकदा दिसते.

या घटनेनंतर तरी रीतसर तक्रारीची वाट न पाहता पंचायत आणि पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि बेपर्वा श्वान मालकांपासून संरक्षण करावे अशी मागणी लोक करीत आहेत.

हेही वाचा