‘किल्ले बनवा स्पर्धे’त साकारले १५२ किल्ले ! शिवप्रेमी संघटनेतर्फे आयोजन

पणजी : गोव्यात झालेल्याराज्यस्तरीय ‘किल्ले बनवास्पर्धे’त (Fort making competition) छत्रपतीशिवाजी महाराजांची राजधानीरायगड (Raigad), छत्रपतीसंभाजी महाराजांनी गोव्यातबांधलेला ‘मर्दनगड’ (Mardangad),फर्मागुढीतील किल्लाअसे अनेक आकर्षक किल्लेसाकारण्यात आले. शिवशाहीचीआठवण करून देणारे हे किल्लेलक्ष वेधी ठरले.

अखिल गोमंतकशिवप्रेमी संघटनेने (AkhilGomantak Shivpremi Sanghatna) दिपावलीच्यानिमित्ताने युवकांमध्येशौर्यजागृती करण्यासाठीराज्यस्तरीय ‘किल्ले बनवास्पर्धे’चे आयोजन केले होते.या अंतर्गत राज्यभरातून१५२ किल्ले साकारण्यात आले.

म्हापसायेथील जी. एस.आमोणकर विद्यामंदिरातर्फेरायगड किल्ला साकारण्यातआला. इतर स्पर्धकांनीही अनेक किल्ले साकारून सर्वांचेलक्ष वेधून घेतले.

सामुदायिकस्तरावर ५८, घरगुतीस्तरावर ९४ जण सहभागी
अखिलगोमंतक शिवप्रेमी संघटनेनेआयोजित केलेली ‘किल्ले बनवास्पर्धा’ ही सामुदायिक स्तरावरील स्पर्धा जिल्हास्तरावर(उत्तर गोवा आणिदक्षिण गोवा), तरवैयक्तिक घरगुती स्तरावरीलस्पर्धा तालुकास्तरावर घेण्यातआली.

स्पर्धेतसामुदायिक स्तरावर ५८, तरवैयक्तिक घरगुती स्तरावर ९४स्पर्धक सहभागी झाले.स्पर्धेला समाजातूनउत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.स्पर्धेच्या परिक्षकांनीआता किल्ल्यांच्या परिक्षणालाप्रारंभ केला आहे. परीक्षणपूर्ण झाल्यानंतर लवकरचस्पर्धेचा निकाल एका सार्वजनिककार्यक्रमातून घोषित केलाजाणार असल्याची माहिती अखिलगोमंतक शिवप्रेमी संघटननेतर्फेदेण्यात आली.
