सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मराठी व्याकरणाचे धडे: राजभाषा संचालनालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मराठी व्याकरणाचे धडे: राजभाषा संचालनालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पणजी: राजभाषा कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, या उद्देशाने राजभाषा संचालनालयाने आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. सरकारी कामकाजात मराठी भाषेचा योग्य व निर्दोष वापर व्हावा यासाठी, कर्मचाऱ्यांसाठी मराठी व्याकरणाच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळांमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे संबंधित खातेप्रमुखांना १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राजभाषा संचालनालयाकडे सादर करावी लागतील. या कार्यशाळेमुळे सरकारी कर्मचारी मराठी भाषेचे व्याकरण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन, प्रशासकीय स्तरावर मराठी भाषेचा वापर अधिक अचूकपणे करू शकतील. 


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा