पोलिसांकडून अज्ञातांविरुद्ध गुन्हा
वास्को: लोंडा जंक्शन ते कुळे रेल्वे (Londa To Kulem Railway Junction) स्थानकादरम्यान एका प्रवाशाची हॅंडबॅग (Handbag) चोरण्यात आली. त्यात २०.६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold Ornaments) व इतर मौल्यवान वस्तू होत्या. वास्को कोकण रेल्वे (Vasco Konkan Railway Police) पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
यासंदर्भात एका इसमाने कोकण रेल्वे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आपली हॅंडबॅग पळविल्याचे म्हटले होते. त्यात आपल्या पत्नीचे सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी वास्को कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज पडताळणे सुरू केले आहे व प्रवाशांकडून माहिती घेतली जात आहे. कुणाला ही यासंदर्भात काही माहिती असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.