मुलीच्या स्वास्थ्यासाठी दिल्लीचे वकील गोव्यात स्थायिक

आज १० वर्षांची मुलगी आहे सदृढ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
मुलीच्या स्वास्थ्यासाठी दिल्लीचे वकील गोव्यात स्थायिक

गुरगाव :  आपल्या मुलीच्या स्वास्थ्यासाठी दिल्लीहून एक वकील गोव्यात (Delhi to Goa) येऊन स्थायिक झाला. आणि खरोखरच त्यांच्या मुलीचे स्वास्थ्यही (Health)  सुधारले. मुलगी ३ वर्षांत असताना दिल्ली, एनसीआर सोडून येऊन गोव्यात स्थायिक झाला. आज १० वर्षांच्या त्यांच्या मुलीचे स्वास्थ्यही सुधारले आहे. त्यामुळे गोव्यात येऊन स्थायिक होण्याचा निर्णय योग्य ठरल्याचे समाधान त्यांना आहे.  

प्रशांत कालरा (Prashant Kalra) असे या वकिलाचे नाव आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास ‘मी एक रिअल इस्टेट एजंट असूनही, एक वडील व पती देखील आहे. २०१९ मध्ये गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे कारण होते ते म्हणजे, ‘‘माझ्या मुलीला दमा आणि ब्रॉंकायटिस होण्याचा धोका होता. हे टाळण्यासाठी ३ वर्षांची असताना गोव्यात येऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आज मुलगी १० वर्षांची आहे व निरोगी आहे. दिल्ली, एनसीआर येथे राहिलो असतो तर जीवन कदाचित कॉर्पोरेट जगताशी जोडले गेले असते. कदाचित एका लॉ फर्मचा भागीदार झालो असतो. खूप पैसेही कमावले असते. मात्र, दिल्ली, एनसीआरमधील जीवनाचा परिणाम झाला असता. 

कालरा यांनी पुढे सांगितले की, गोव्याने त्यांना त्यांच्या स्वत:च्या अटींवर करिअर घडवताना मंद गतीने जीवनशैलीकडे वळण्याची परवानगी दिली. ‘‘मला आवडणारे काम माझ्या स्वत:च्या गतीने आणि माझ्या स्वत:च्या वेळेनुसार करायचे आहे.’’ या जीवनशैलीमुळे आरोग्य व निरोगी राहण्यास प्राधान्य देण्यास प्रोत्साहन मिळाले. मेट्रो जीवनशैलीत अशक्य झाले असते. ‘‘मी कधीही माझ्या स्वत:च्या आरोग्यावर व तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रीत केले नसते कारण माझ्याकडे वेळ नसता,’’ असे ही कालरा यांनी स्पष्ट केले आहे. 


हेही वाचा