अपघातानंतर आल्त-बेती येथे १८ तास वीज गायब

दिवाळीच्या दिवसांत स्थानिकांना फटका

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
अपघातानंतर आल्त-बेती येथे १८ तास वीज गायब

पणजी :  आल्त -बेती  (Alto-Betim) येथे ट्रकची (Truck accident ) धडक बसून अनेक विजेचे खांब (Electric Poles) कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर या परिसरातील वीज गायब झाली. तब्बल १८ तास येथील स्थानिकांना वीज नव्हती.

ट्रकच्या धडकेत चार विजेचे खांब कोसळले तर विजेचे केबल ही पडले. या धडकेत पर्वरीतील ब्रम्हा कुमारीच्या भिंतीची ही हानी झाली. वीज खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पडलेले चार विजेचे खांब पुन्हा बसवून व्यवस्थित करणे कठीण आहे. काही तांत्रिक कारणामुळे येथील काही घरांना होणारा वीज पुरवठा करण्याच्या कामाला विलंब होऊ शकतो. अनेक समस्यांमुळे होणारा विजेचा लपंडाव दूर करण्यासाठी भूमीगत वीज वाहिन्या बसवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

हेही वाचा