समुद्रकिनाऱ्यांवर वाचवले १९ जणांचे प्राण : फेसाळत्या समुद्राच्या लाटांची अनेकांना भुरळ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
समुद्रकिनाऱ्यांवर वाचवले १९ जणांचे प्राण : फेसाळत्या समुद्राच्या लाटांची अनेकांना भुरळ

पणजी : गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर (Goa beaches)  ’जीवाचा गोवा’ करण्यासाठी येणाऱ्यांना फेसाळत्या लाटा पाहून समुद्र स्नानासाठी उतरण्याचा मोह आवरत नाही. ‌ सूचना देणारे पोलीस,  जीवरक्षक ( lifeguard)  कुणालाच न जुमानता अनेकजण समुद्रात उतरत असतात. त्यातील काहीजण मदिरेच्या आहारीही असतात. पोहता येत नसल्याने किंवा दारूच्या नशेत बुडायला लागले की, जीव वाचवावा म्हणून आरडाओरड करीत असतात. गोव्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर अशाचप्रकारे बुडत (drowning) असलेल्या १९ जणांना  लाइफसेव्हर्सनी वाचवले. त्यात ९ रशियन (Russian Tourist) नागरिकांचा समावेश होता. 

यासंदर्भात सविस्तर माहिती

पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर कर्नाटकातील एका २१ वर्षीय युवक व दोन साथीदार सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष करीत समुद्रात उतरले. जोरदार प्रवाहाने खोल पाण्यात ओढले जाऊ लागताच, जेटस्कीवर समीर काणकोणकर यांच्या मदतीने जीवरक्षक विकास मेहता यांनी रेस्क्यू ट्यूबचा वापर करून त्याला किनाऱ्यावर आणले. 

बटरफ्लाय समुद्रकिनाऱ्यावर, गुजरातमधील एका २५ वर्षीय युवक फोटोसाठी पोज देताना ‘रिप करंट’मध्ये अडकला. जीवनरक्षक शेखर वेळीप यांनी त्याला वाचवले.  पाटणे येथे ६२ वर्षीय व्यक्ती प्रवाहात पोहत असताना अडकल्यानंतर जीवरक्षक अरविंद गिरिप यांनी त्याची सुटका केली.  कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर छत्तीसगडमधील १७ वर्षीय आणि उत्तर प्रदेशातील २९ वर्षीय तरुणाला जीवरक्षकांनी वाचवले. कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर, चार वेगवेगळ्या घटनांमध्ये एका ४२ वर्षीय रशियन महिलेला, छत्तीसगडमधील २५ वर्षीय पुरूषाला आणि ५० ते ५९ वयोगटातील तीन इतर रशियन महिलांना वाचवण्यात यश आले.

बागा समुद्रकिनाऱ्यावर दोन रशियन महिला, कर्नाटकातील एक पुरूष आणि तामिळनाडूतील दोन पुरूषांना वाचवण्यात आले.

याशिवाय, उत्तर प्रदेशातील एका चार वर्षीय मुलाला अपस्माराचा झटका आल्यानंतर जीवरक्षकांनी त्याला प्रथमोपचार देऊन इस्पितळात दाखल केले. सिकेरी, मोरजी, दूधसागर येथेही बचावकार्य करण्यात आले. जोरदार प्रवाहात अडकलेल्या भारतीय व रशियन पर्यटकांना वाचवण्यात आले.


हेही वाचा