रेईश मागूशमध्ये पंचतारांकित हॉटेलसाठी मार्ग मोकळा!

३१,२८० चौ.मी. जमीन गुंतवणूक क्षेत्र म्हणून घोषित

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
31st July, 04:23 pm
रेईश मागूशमध्ये पंचतारांकित हॉटेलसाठी मार्ग मोकळा!

पणजी : रेईश मागूश पंचायतीच्या हद्दीत स्पार्क हेल्थलायन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पाच आणि चार तारांकित हॉटेलांचे प्रकल्प उभारण्यासाठी ३१,२८० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली जमीन गुंतवणूक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (आयपीबी) मान्यतेनंतर यास अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली.

आयपीबीने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर, सर्व्हे क्रमांक ९५/१-ए या जागेवर पाच आणि चार तारांकित हॉटेलांची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित जमीन आता अधिकृत गुंतवणूक क्षेत्र ठरल्याने, स्थानिक पंचायतीऐवजी आयपीबी कायद्यांतर्गत आयपीबीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे घरपट्टी, इमारत परवाने आणि अन्य शुल्कांबाबतचे अधिकार केंद्रित झाले आहेत. या प्रकल्पामुळे रेईश मागूश पंचायतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्यटन सुविधा उभ्या राहणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा