वेर्णा पोलिसांची कारवाई
पणजी : वेर्णा येथील पिरणी सर्कल बसस्थानकाजवळ सोमवारी सायंकाळी राबवलेल्या अंमली पदार्थविरोधी कारवाईत वेर्णा पोलिसांनी सुमारे २.२१३ लाख रुपये किमतीचा २.२ किलो गांजा जप्त केला . याप्रकरणी राहुल कुमार केरवट (वय २८, मूळ मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. केरवट सध्या वेर्णा येथील कुंभारदात येथे वास्तव्यास होता.
गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी सायंकाळी ६ ते ९:१९ दरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपीला गांजासह रंगेहाथ पकडण्यात आले. पंचनाम्यानंतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम २०(ब)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुरगावचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कामत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या नेतृत्त्वाखाली उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस यांनी याप्रकरणी कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.