मुरगाव पालिकेने उगारला कारवाईचा आसूड!
पणजी : वास्को बाजार परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात मुरगाव नगरपालिका प्रशासनाने मंगळवार सकाळी धडक कारवाई केली. अनेक वेळा सूचना दिल्यानंतरही विक्रेत्यांनी अतिक्रमण हटवले नसल्यामुळे ही मोहीम हाती घेण्यात आली.
विक्रेत्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी अतिक्रमण न हटवता नियमांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पालिकेला कठोर भूमिका घ्यावी लागली असून, कारवाई दरम्यान काही विक्रेत्यांचा माल जप्त करून तो वृद्धाश्रमांना देण्यात आला अशी माहिती नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी दिली
आता पुन्हा अतिक्रमण झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेने सर्व विक्रेत्यांना दिला आहे.बाजार परिसरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व अनधिकृतपणे जागा व्यापणाऱ्या विक्रेत्यांविरोधात पुढील कारवाया सुरूच राहणार असल्याचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.