मेघालयातील हनिमून मर्डर प्रकरण
चेरापुंजी : मेघालयमधील हनिमून मर्डर प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी आरोपी सोनम रघुवंशीच्या फोनवरील रहस्यमय ‘संजय वर्मा’ या व्यक्तीची ओळख उघड केली आहे. मेघालयमधील सोहरा (चेरापुंजी) परिसरात तिच्या पतीचा खून घडवून आणल्याचा आरोप सोनम रघुवंशीवर आहे.
चौकशीतून समोर आले की, सोनम रघुवंशीने आपला पती राजा रघुवंशीच्या हत्येतील सहआरोपी व कथित प्रियकर राज कुशवाहा याचा फोन नंबर ‘संजय वर्मा’ या बनावट नावाने सेव्ह केला होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.
पोलिसांनी मिळवलेल्या कॉल रेकॉर्डनुसार, सोनम आणि ‘संजय वर्मा’ (राज कुशवाहा) यांच्यात अनेकदा संवाद झाला होता. यावरून त्यांच्यातील जवळचा संबंध स्पष्ट होतो.
१ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत सोनम आणि ‘संजय’ यांच्यात एकूण २३४ कॉल्स झाले होते. प्रत्येक कॉल साधारणतः ३० ते ६० मिनिटांचा होता.
राजा रघुवंशी खून प्रकरणात संजय वर्मा याचे नाव समोर आल्यानंतर, आरोपी सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंद याने संजय वर्मा याला ओळखत नसल्याचे सांगितले.
गोविंदने पत्रकारांशी बोलताना सांगितले, मला संजय वर्मा बद्दल काहीच माहिती नाही. मी फक्त तुम्हाला राज ज्या ठिकाणी काम करत होता ती ठिकाणे दाखवायला आलो होतो. इथून काहीही जप्त केले गेलेले नाही. संजयविषयी मला काही माहिती नाही. आजच मला कळले की संजयचे नावही या प्रकरणात येत आहे.