वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ चे वेळापत्रक जाहीर

टीम इंडियाचा प्रवास इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून होणार सुरू

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
16th June, 12:22 am
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ चे वेळापत्रक जाहीर

दुबई : आयसीसीने २०२५-२७ या कालावधीतील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. एकूण ९ संघ या चक्रात सहभागी होणार असून ७१ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. १७ जून २०२५ पासून श्रीलंका-बांगलादेश यांच्यातील गाले येथील सामन्याने या चक्राला सुरूवात होणार आहे.
भारताचा संघ यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण १८ सामने खेळणार आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत आता शुबमन गिल कर्णधारपद भूषवणार आहे. भारताचा पहिला सामना २० जून रोजी इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले येथे होणार असून ही मालिका ‘पतौडी ट्रॉफी’अंतर्गत खेळली जाईल.
संपूर्ण चक्रात अन्य प्रमुख मालिका
ऑस्ट्रेलिया : सर्वाधिक २२ सामने खेळणार. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या मालिका.
इंग्लंड : २१ सामन्यांमध्ये सहभाग. भारत व ऑस्ट्रेलियाशी दोन जबरदस्त मालिकांमध्ये भिडणार.
दक्षिण आफ्रिका: आपला पहिला सामना पाकिस्तानमध्ये खेळणार. घरच्या मैदानावर सप्टेंबर २०२६ नंतरच सामना.
श्रीलंका-बांगलादेश: १७ जूनपासून गाले येथे पहिला सामना.
दक्षिण आफ्रिका : सध्याचा चॅम्पियन
२०२३-२५ च्या चक्रात दक्षिण आफ्रिका विजेता ठरला असून त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. ते यंदा पाकिस्तानविरुद्ध ऑक्टोबर २०२५मध्ये मोहिम सुरू करतील.
भारताचे संपूर्ण वेळापत्रक
सामने     प्रकार           विरोधक           स्थळ
५           परदेश दौरा         इंग्लंड             इंग्लंड
२           परदेश दौरा         श्रीलंका           श्रीलंका
२           परदेश दौरा          न्यूझीलंड           न्यूझीलंड
३           घरी              वेस्ट इंडिज         भारत
२           घरी           दक्षिण आफ्रिका      भारत         
५           घरी              ऑस्ट्रेलिया      भारत
एकूण      –      –                १८ सामने