दोडामार्ग- मांगेलीत सख्ख्या भावांना विजेचा धक्का; एक ठार, तर एक गंभीर

कुसगेवाडीतील प्रकाराने गावावर शोककळा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th June, 03:28 pm
दोडामार्ग- मांगेलीत सख्ख्या भावांना विजेचा धक्का; एक ठार, तर एक गंभीर

दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथे शुक्रवारी सकाळी दोन सख्ख्या भावांना विजेचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

अपघातानंतर दोघांना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी नागेश पांडुरंग गवस (३५) यांना मृत घोषित केले, तर संदीप पांडुरंग गवस (४५) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोवा जीएमसीमध्ये हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून गवस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याघटनेबाबत सविस्तर माहिती मिळवत आहोत. 

हेही वाचा